खून करून फरार झालेला आरोपी काही तासात अटक…

 

गोंदिया, दी. 24 मे : छोटा गोंदिया येथे एका मित्रानेच आपल्या मित्राचा धार धार चाकूने वार करीत खून केला मात्र खून केल्यानंतर आरोपी मित्र घटणास्थावरून फरार झाला होता. फरार आरोपीला पोलिसांनी काही तासातच पकडले आहे. जितेश चौक, छोटा गोंदिया येथे ही घटना घडली होती.

मृतक नामे- राहुल दिलीप बिसेन वय 22 वर्ष, रा. छोटा गोंदिया यास आरोपी नामे – प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर वय 23 वर्ष, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया यांनी त्यांचेमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपी- प्रतीक भोयर याने मृतक- राहुल बिसेन याचे पोटावर, छातीवर व कोथ्यावर धारदार चाकुने वार केले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

सदर घटना 23 मे च्या रात्रीला 11 : 30 वाजता घडली, मृतकाचे वडील दिलीप जिवनलाल बिसेन रा. छोटा गोंदिया यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 332/2024, कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर गुन्हयातील आरोपी- प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर हा खुन केल्यानंतर घटनास्थळावरुन पळुन गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा सोध घेऊन त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा प्राथमीक तपास पोउपनि मंगेश वानखडे यांनी केला असुन गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल पुढील तपास रोहिणी बानकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया करीत आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिनी बानकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गोंदिया शहर चे पोलीस निरिक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे पथक सपोनि सोमनाथ कदम, सपोनि विजय गराड, सपोनि संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि घनश्याम थेर, मपोउपनि पुजा सुरळकर, पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, श्याम कोरे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, सनोज सपाटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक- सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्णे, पोहवा राजु मिश्रा, महेश मेहर, संतोष केदार, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, अजय रहांगडाले, चालक गौतम यांनी कामगिरी केली.

news portal development company in india

Read More Articles