गोंदिया, दी. 24 मे : शहरालगत असलेल्या छोटा गोंदिया परिसरामध्ये मध्यरात्री हत्येचा थरार घडला. क्षुल्लक वादातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना 23 मे च्या मध्य रात्रीला उघडकीस आली आहे. राहुल बिसेन वय 21 वर्ष असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर सोनू भोयर वय वर्ष 22 असे आरोपी मित्राचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास क्षुल्लक वादातून हत्येचा थरार घडला असून हत्या केल्यानंतर आरोपी सोनु भोयर हा फरार झाला आहे. घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गोंदिया मध्ये सातत्याने हत्यांचे प्रकार सुरू आहेत, काहीवेळा क्षुल्लक कारणावरून हत्या होतात तर काहीवेळ सुपाळी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न होतो, शहरातिल वाळू व्यवसायाशी संबंधित अशलेली वेक्ती गोलू तिवारी याची 23 एप्रिल रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या झाली होती. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर देखील गोळीबार करीत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न 11 जानेवारी रोजी करण्यात आला होता.