लाच प्रकरणात गोंदिया पंचायत समितीच्या पशूधन पर्यवेक्षकाला अटक

 

 

  • ऑगस्ट 2023 मध्ये लाच घेणाऱ्या दोघांना केली होती मदत

गोंदिया, दि. 23 मे 2024 : मांसल कुक्कुट पक्षीगट योजने अंतर्गत कुकुट पालनाकरिता उभारणी केलेल्या शेडच्या अनुदानाचा दुसऱ्या हप्त्याचा धनादेश काढून देण्याकरिता 3 आॅगस्ट 2023 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येथील पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश ईश्वरदास करवाडे ( वय 39 ) व खासगी व्यक्ती महेंद्र हगरू घरडे ( वय 50, रा. चुटीया, ता. गोंदिया ) यांना अटक केली होती. याच प्रकरणात तिसरा आरोपी तेजलाल हाैसलाल रहांगडाले ( वय 57, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती गोंदिया ) याला लाच रक्कम स्वीकारण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मंगळवार, 21 मे 2024 रोजी गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.

news portal development company in india

Read More Articles