धक्कादायक! भावाबहिणीचा एकाच वेळी गूढ मृत्यू, घरात आढळले रक्तानं माखलेले कपडे

उज्जैन प्रतिनिधी : मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधील जिवाजीगंज पोलीस स्टेशन परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोघा भावाबहिणीने हाताची नस कापून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजुंनी तपास करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर एक सुसाईड नोट सापडली आहे. यात मृत तरुणाने लिहिलं आहे की ‘तुम्ही मला डोळ्यांचे उपचार करण्यासाठी नेलं नाही, तुम्ही आमची काळजी घेतली नाही. आईही आमच्याकडे लक्ष ठेवायची नाही.’ मृत तरुणाला डोळ्यांचा आजार होता.  त्याला नीट दिसत नव्हतं, त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे.

घटनास्थळावर सल्फासची गोळी देखील सापडली आहे. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मृत भावाबहिणीच्या हाताच्या नसा कापलेल्या असून घरात रक्ताचा एक डागही पोलिसांना सापडलेला नाही. पण पोलिसांना एका पिशवीत रक्ताने माखलेले कपडे सापडले आहेत. त्यामुळे  पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.

ऑनलाईन ट्यूशन घ्यायचा मृत तरुण

मृत तरुण बोहरा समाजातील मुलांची ऑनलाईन ट्युशन घेत होता. पोलीसांकडून मृत तरुणाच्या  कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीचं फुटेजही तपासलं जात आहे. पोलिसांनी पूर्ण घराची झडती घेतली, पण घरात रक्ताच्या खुणा मिळालेल्या नाहीत. मात्र ज्या कापडाने रक्त स्वच्छ केले ते कापड पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा आता विविध अँगलने तपास करत आहेत.

पोलिसांनी दोन्ही भावाबहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेले आहेत. उज्जैनचे सीएसपी सुमित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या मृत्यूची बातमी 6 वाजता मिळाली. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शनिवारी पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर रिपोर्ट आल्यावर दोघांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

news portal development company in india

Read More Articles