वीर्य दुसऱ्याच व्यक्तीचं; बलात्कार प्रकरणी 2 वेळा फाशीची शिक्षा, 11 वर्षांनी सुटका

भोपाळ : एका व्यक्तीला ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी तीन वेळा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र ११ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये धक्कादायक अशी घटना समोर आलीय. व्यक्तीच्या डीएनए रिपोर्टमध्ये गडबड झाल्याने त्याची सुटका करण्यात आली. मुलीच्या डीएनए रिपोर्टरमध्ये समोर आलं की, वीर्य अटक केलेल्या आरोपीचे नव्हते तर दुसऱ्याच व्यक्तीचे होते.

खंडवा इथल्या अनोखीलाल यांना विशेष न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. ४ मार्च २०१३ ला शिक्षा सुनावली होती तेव्हा अनोखीलाल २१ वर्षांचा होता. या प्रकरणी पोलिसांनी एक महिन्याच्या आत तपास केला होता आणि त्यानंतर ९ वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी कठोर शिक्षा दिली गेली होती. धक्कादायक म्हणजे मुलीची जी डीएनए चाचणी केली गेली त्यात असं समोर आलं की वीर्य दुसऱ्याच पुरुषाचं होतं तरी अनोखीलाल याला शिक्षा सुनावली होती.

विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार अनोखीलाल त्या मुलीसोबत शेवटचा दिसला होता. त्याच्या आधारे शिक्षा सुनावली गेली. डीएनए रिपोर्टमध्ये अनोखीलालचे केस मुलीच्या हातात आढळले होते तर त्वचेचा काही भाग मुलीच्या नखांमध्ये सापडला होता. याशिवाय मुलीच्या रक्ताचे डाग अनोखीलालच्या अंडरविअरवर होते. पण १९ मार्च २०२४ ला एका याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्राची पटेल यांनी डीएनए रिपोर्टमध्ये आढळलेल्या त्रुटींचा दाखला देत अनोखीलालला निर्दोष मुक्त केलं. त्यांनी म्हटलं की, नमुने गोळा करणे, सील करणे आणि रिपोर्टमध्येही गोंधळ होता.

न्यायालयाने म्हटलं की, मुलीच्या डीएनए रिपोर्टवरून हे स्पष्ट आहे की वीर्य दुसऱ्या व्यक्तीचं होतं. मुलीच्या नखात आढळलेली त्वचा आणि तिच्या रक्ताचे डाग याबाबत पूर्ण तपासानंतरच आरोपीला शिक्षा देता येऊ शकते.

न्यायालयाने आदेशात म्हटलं की, डीएनए रिपोर्ट वैज्ञानिकांनी मशिन्सच्या आधारावर तयार केलीय आणि ते पूर्ण पुरावे आहेत. तर मानवी पुरावे तपास प्रभावित करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सर्व पुराव्यांच्या विरोधात डीएनए रिपोर्ट असल्याने त्याच्या आधारे आरोपीची सुटका होऊ शकते. आरोपीशिवाय बलात्कार प्रकरणात दुसरी व्यक्तीही होती असं नमूद करत याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

news portal development company in india

Read More Articles