कोलकाता : सक्तवसुली संचालनालयाने तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कंवर दीप सिंह यांच्यावर मोठी कारवाई केलीय. अल्केमिस्ट ग्रुपच्याा २९ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत केडी सिंह यांचे एक बीचक्राफ्ट विमान, हिमाचल, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील फ्लॅट, जमीन जप्त करण्यात आले आहेत. ईडीने या गुन्ह्याअंतर्त तृणमूल काँग्रेसचा १०.२९ कोटी रुपयांचा एक डिमांड ड्राफ्टही जप्त केला आहे.
ईडीने कारवाईनंतर सांगितलं की, केडी सिंह यांच्या संपत्तीला पीएमएलए अंतर्गत २९.४५ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली. यामध्ये बीचक्राफ्ट किंग एअर सी९०ए एअरक्राफ्ट, हिमाचलच्या शिमला-सिरमौर आणि मध्य प्रदेशात असलेल्या कटनी जिल्ह्यातील फ्लॅट आणि जमीन यांचाही समावेश आहे.
ईडीने म्हटलं की, हरियाणाच्या पंचकुला इथं पार्श्वनाथ रॉयल प्रोजेक्टमध्ये अल्केमिस्ट रियल्टी लिमिटेडकडून खरेदी केलेल्या एकूण १८ फ्लॅटसह शेकडो एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. केडी सिंह यांची कंपनी अल्केमिस्ट ही तृणमूल काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा प्रचारात वापरलेल्या विमानसेवेचे पैसे देणार होती. या विमानांचा वापर तृणमूलच्या स्टार प्रचारकांसाठी केला होता.
केडी सिंह हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी अल्केमिस्ट ग्रुपच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर सीबीआय, कोलकाता पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २०१८ मध्ये पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याआधी २०१६ मध्ये कंपनीने गरीब लोकांना १९०० कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.