इंदिरा गांधींनी कच्चातिवू बेट श्रीलंकेला दिलं; काँग्रेसने देशाचे तुकडे केले; PM मोदींचा घणाघात

दिल्ली : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळात कच्चातिवु द्वीप श्रीलंकेला देण्यात आला होता अशी बातमी समोर आली आहे. यानंतर आता सत्ताधारी भाजपकडून काँग्रेसवर हल्लाबोल केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसला संवेदनाहीन असल्याचं म्हणत टीका केलीय. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नव्या तथ्यांमधून असं समजतं की, काँग्रेसने कच्चातिवु द्वीप संवेदनाहीन पद्धतीने श्रीलंकेला दिला होता.

डोळे उघडणारी आणि धक्कादायक अशी बातमी, काँग्रेसने कसं असंवेदनशीलपणे कच्चातिवु बेट श्रीलंकेला दिलं हे समजतं. यामुळे प्रत्येक भारतीय नाराज असून लोकांच्या डोक्यात ही गोष्ट पक्की झालीय की काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही असं पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर म्हटलं.

भाजप तामिळनाडुचे अध्यक्ष के अन्नमलाई यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रश्न विचारला होता. त्यावर मिळालेल्या उत्तरामध्ये असी माहिती समोर आली होती की, पाक जलसंधी अंतर्गत कच्चातिवु बेट हे श्रीलंकेला सोपवण्याचा निर्णय़ १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने घेतला होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची एकता, अखंडता आणि हितांना कमकुवत करणं हीच काँग्रेसची ७५ वर्षांपासूनची कामाची पद्धत आहे.

काँग्रेसकडूनही कच्चातिवु बेटाबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. प्रवक्ते ए नारायणन यांनी म्हटलं की, देशाच्या एकतेच्या मुद्द्यावर भाजपला बोलण्याचा अधिकार नाही. इंदिरा गांधींना सोडलं तर दुसरा कोणताही दुसरा नेता इतका धाडसी नव्हता. काँग्रेसने तामिळनाडुतील शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं आहे. कच्चातिवु द्विपवर करारानंतर आणीबाणीवेळीही एक करार झाला होता. २३ मार्च १९७६ मध्ये झालेल्या करारात मन्नारची खाडी आणि बंगालच्या खाडीचा उल्लेख होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

news portal development company in india

Read More Articles