शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झांसी : तुरुंग कसे असते हे तुम्ही चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये पाहिले असेल. तुरुंगात कैद्यांना काम करावे लागते, त्यांच्या योग्यतेच्या आधारावर त्यांना कामे दिली जाते. पण तुरुंगात कैदी पैसेसुद्धा कमावतात, हे तुम्हाला माहितीये का? नाही ना. तर ही बातमी तुमच्यासाठी आहेच. तुरुंगात असतानाही कैद्यांची काही प्रमाणात कमाई होती. तुरुंगातील बंदी असलेल्या या कैद्यांना कामाच्या बदल्यात पैसे दिले जातात.
झाशी येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विनोद कुमार यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना प्रथम प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर, जेव्हा ते त्यांच्या कामात तरबेज बनतात, तेव्हा त्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात काही रक्कम दिली जाते.
उत्तर प्रदेश सरकारने जेल मॅन्युअलमध्ये ही रक्कम निश्चित केली आहे. अनुभव आणि कामाच्या आधारे प्रतिदिन 81 रुपये, 60 रुपये आणि 50 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा आहे.
watermelon : टरबूज खाण्याची योग्य वेळ काय, या गोष्टी माहिती असायलाच हव्यात, अन्यथा होईल नुकसान
बंदी घरी पाठवू शकतात पैसे –
कारागृह अधीक्षक विनोद कुमार म्हणाले की, कैदी तुरुंगात कमावलेली रक्कम चेकद्वारे त्यांच्या कुटुंबीयांना किंवा वकिलाला देऊ शकतात. भारतातील विविध राज्यांमध्ये जेल मॅन्युअलच्या आधारे कैद्यांसाठीची रक्कम निश्चित केली जाते, अशी माहितीही त्यांनी दिली. लोकल18 च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुरुंगाशी संबंधित आणखी अशी इतर रंजक गोष्टींची माहिती देत राहू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.