संबंधित बातम्या
भोपाळ : प्रेम आंधळ असतं, असं म्हणतात. प्रेमात माणूस कोणत्याही थराला जायला तयार असतो. काहीवेळा तर तो चूक आणि बरोबर यातील फरक पाहणंही बंद करतो. मध्य प्रदेशमधून अशीच एक अजब प्रेमकहाणी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं तिच्या अल्पवयीन भाचीला फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करून तिचं लैंगिक शोषण केलं असल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे.
आरोपी महिलेचे इतर 10 महिलांशीही अवैध संबंध होते. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. महिलेला न्यायालयात हजर केलं आणि तिची कारागृहात रवानगी केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या टांडा बरूर पोलीस स्टेशन परिसरातून ही विचित्र घटना उघडकीस आली आहे. आपल्या अल्पवयीन भाचीला लग्नासाठी फसवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेचे यापूर्वी जवळपास 10 महिलांसोबत संबंध होते.
एका 24 वर्षीय विवाहितेला तिच्या भाचीसोबत लग्न आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर भागातील महिलेचा विवाह वर्षभरापूर्वी उमरखळी येथील एका व्यक्तीशी झाला होता. यानंतर तिने आपल्या 16 वर्षीय भाचीला आमिष दाखवून आपल्या वासनेची शिकार बनवली. त्यानंतर तिला कपडे आणण्याच्या नावाखाली बाहेर नेलं आणि महिनाभरापूर्वी ती गायब झाली.
27 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी महिलेवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी महिलेला धार जिल्ह्यातील पिथमपूर येथून अटक केली. तिच्याकडून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस तपासादरम्यान महिलेचं हे कृत्य समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
चौकशीत अल्पवयीन मुलीने सांगितलं की, ‘महिलेनं माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मला लग्नाचे वचन देऊन पिथमपूरला आणले. इथे आमचे लग्न झाले. मंगळसूत्र घातले, हार घालून आम्ही नवरा-बायकोसारखे जगत होतो. महिलेनं पण तिचा गेटअप बदलला, तिने बॉय कट केला आणि पँट शर्ट घालू लागली. दरम्यान, तिने अनेकवेळा शारीरिक शोषण केले.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.
- First Published :