मुकुल सतीजा, प्रतिनिधी
कर्नाल : सध्याच्या काळात तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. अनेक तरुणांना विविध प्रकारचे व्यसन लागली आहेत. कुणाला दारू, सिगारेट, ड्रग्स तर कुणाला इतर प्रकारची व्यसने लागली आहेत. अशाच परिस्थितीत एक व्यक्ती असा आहे, जो ड्रग्जविरोधातील मोहिमेसाठी घर सोडून निघाला आहे. या व्यक्तीचे वय 66 वर्षे आहे. मात्र, त्यांची ऊर्जा तरुणाईला लाजवेल अशी आहे.
अभिराम असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे वय 66 वर्षे असून ते ओडिशा येथील रहिवासी आहे. ड्रग्जविरोधातील मोहिमेसाठी ते घर सोडून पायी यात्रा करत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 2021 मध्ये त्यांनी पायी यात्रा सुरू केली होती. त्यावेळी कोरोनाचा काळ होता यामुळे ते घरी परतले. त्या दरम्यान, ते भूतान, नेपाळ आणि चीनच्या सीमेपर्यंत गेले होते. मात्र, यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा पायी यात्रा सुरू केली आहे. यावेळी ते कन्याकुमारीहून काश्मिरला गेले आणि आता काश्मिरवरुन कन्याकुमारीच्या दिशेने जात आहे.
आपल्या यात्रेदरम्यान ते कर्नालला पोहोचले. यावेळी अभिराम यांनी लोकल18 ला सांगितले की, ते पूर्वी वीज विभागात काम करत होते. मात्र, आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. तसेय या यात्रेसाठीचा खर्च ते त्यांच्या पेन्शनमधूनच करत आहेत. 2021 मध्ये जेव्हा त्यांनी आपली पहिली यात्रा सुरू केला तेव्हा त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. कारण, ते एक संदेश घेऊन घरातून निघाले होते. मात्र, ते दररोज त्यांच्या घरी फोनवर संवाद साधतात.
कुटूंब पाहतंय वाट –
अभिराम यांनी सांगितले की, कोरोनामुळे त्यांना आपली यात्रा बंद करावी लागली होती. मग यानंतर आता 2023 मध्ये त्यांनी पुन्हा आपली यात्रा सुरू केली. यामध्ये आतापर्यंत त्यांनी कन्याकुमारीहून काश्मिर आणि काश्मिरहून कर्नालपर्यंत 6600 किमी पर्यंतची पायी यात्रा पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना 11 महिन्याचा कालावधी लागला. आता ते कन्याकुमारीला जाणार आहेत. त्यानंतर तिथून परत ते आपल्या घरी ओडिशाला जातील. यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागेल. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, 1 मुलगा आणि 2 मुलीही आहेत. हे सर्वजण त्यांची वाट पाहत आहेत, असे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.