03

या घटनेचा त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि वंचित, शोषित, पीडित वर्गासाठी आपले आयुष्य वेचत राजकारणात प्रवेश केला. त्यांनी सीपीआय तिकिटावर सर्वप्रथम 1957 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना 17,378 मते मिळाली आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा 3,345 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला.