गौरव सिंह, प्रतिनिधी
भोजपुर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. एका मुलीवर दोन जणांनी आपला दावा केला आहे. तसेच दोन्ही जण या मुलीसाठी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
एका पक्षाने सांगितले की, मुलीची आई मी आहे, त्यामुळे माझ्याकडे ही मुलगी द्यावी. तर दुसऱ्या पक्षाने सांगितले की, मुलीचे पालनपोषण आम्ही करतो, त्यामुळे मुलगी आमच्याकडे देण्यात यावी. बिहारच्या आरामध्ये समोर आलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
यावेळी पोलीस ठाण्यात एएसपी परिचय कुमार यांना बोलावण्यात आले. त्यांनी नंतर मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या एक्सपर्ट सुनीता सिंह यांना बोलावले. त्यांच्या सल्ल्यानुसार हे मुलगी बाल कल्याण समिती (CWC) यांच्याकडे सोपवण्यात आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
संबंधित मुलीचे वय 5 वर्षे आहे. उदवंतनगर पोलीस ठाणे हद्दी क्षेत्रातील कुसामहा गावातील दीपा कुमारी या महिलेने नवादा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गौरी त्रिपाठी नावाच्या मुलीने माझ्या मुलीचे अपहरण केले असून ती तिला विकणार असल्याची तक्रार दिली. यानंतर गौरी त्रिपाठी हिला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. गौरी त्रिपाठीने सांगितले की, ही मुलगी तिची असून ही महिला खोटे बोलत आहे.
याठिकाणी संबंधित मुलीवरुन दोन्ही महिलांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही महिला म्हणत होत्या मुलीचा ताबा आमच्याकडे देण्यात यावा. शेवटी बाल कल्याण समितीचे कोऑर्डिनेटर धमरेंद्र कुमार यांना बोलावण्यात आले आणि नवादा पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रियेद्वारा मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले.
गायीसोबत दररोज 4 किलोमीटर मॉर्निंग वॉक, चहा-बिस्कुटही खाऊ घातले जाते, काय आहे यामागचं नेमकं कारण?
पहिली महिली काय म्हणाली –
मुलीची आई असल्याचा दावा करणारी महिला दीपा देवी हिने सांगितले की, त्याच्या गावात कुसामहामध्ये गौरी त्रिपाठी हिने शाळा उघडली होती. त्या शाळेत आम्ही काम करायचो. माझी एक मोठी मुलगी आणि एक लहान मुलगा त्याच शाळेत शिक्षण घेत होते. त्यावेळी माझी लहान मुलगी फक्त दीड वर्षाची होती. तर गौरी त्रिपाठी हिने सांगितले की, आम्ही या मुलीला आमच्याकडे ठेवतो, तुम्हाला हवे तेव्हा घेऊन जाऊ शकता. त्यावेळी आम्ही काहीही न विचारता मुलीला दिले आणि आता मागितले तर ते माझ्या मुलीला देत नाही आहेत.
तर दुसरीकडे गौरी त्रिपाठी हिने सांगितले की, ही मुलगी दीड वर्षांची होती तेव्हा ती खूप आजारी होती. तिला अनेक प्रकारचे आजार होते. त्यावेळी तिची आई आणि इतर लोकांना तिला मारुन टाकायचे होते. मात्र, आम्ही या लोकांना विनंती करून मुलीला घेऊन गेलो. त्यावेळी या लोकांनी आनंदाने मुलीला निरोप दिला. आता मुलगी 5 वर्षांची झाली, आम्ही तिची तब्येत सुधारली. तिला शिक्षण दिले. मात्र, आता 3 वर्षांनी हे लोक तिला परत मागत आहेत. मुलीच्या संगोपनासाठी, औषधोपचारासाठी मागील 3 वर्षांपासून सर्व प्रयत्न केले. मात्र, आता ते मूल या लोकांना कसे देऊ, असा प्रश्न तिने केला. दरम्यान, आता या मुलीला बालकल्याण समितीकडे देण्यात आले आहे. समितीद्वारा पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.