दिनांक 23 : सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या; गट ग्रामपंचायत चिखली येथील ग्राम कोहळीटोला या गावी.! वार्ड क्रमांक ३ मध्ये रस्त्यावर चिखल असल्याने, गावातील लोकांना आणि या मार्गाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावर पावसाळ्यात चारही बाजूला चिखल असल्याने, त्या रोडवर मुरूम आणि पक्का रस्ता तयार करण्यासाठी मागील काही वर्षांपासून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चिखली येथे लेखी निवेदन देऊन ही ग्रामपंचायत सरपंच यांनी आतापर्यंत काहीच केले नाही.
त्यामुळं त्रस्त ग्रामस्थांनी रोष म्हणून चक्क रस्त्यावर भात पिकाची लागवड करून ग्रामपंचायत प्रशासनाचा रोष व्यक्त केला आहे.