गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथे दि.१८ जून रोजी सांयकाळी ४ च्या दरम्यान; वादळी व वीजांचे गडगडाटासह आलेल्या पावसाने वीज पडून एका म्हशीचा मृत्यू आणि एक ईसम जखमी झाला आहे.
कोसमतोडी येथील महादेव सोनवाने अंगणात म्हैस बांधत असतांना; अचानक वीज पडून त्यांच्या एका म्हशीचा मृत्यू झाला. तर यात महादेव सोनवाने जखमी झालेत. घटनेनंतर त्यांना लगेच उपचारांसाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु आहेत.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी मृत म्हशींचा मोका पंचनामा केला. वीज पडून मृत झालेल्या म्हशींमूळ शेतकऱ्याचे जवळपास ४० हजारांचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.