“इवल्याशा काव्यासाठी बाप झाला आई” 

 

सडक अर्जुनी :- हे जिवन खुप संदर आहे’,असं म्हटलं जाते,परंतू हेच जिवन कुणाच्या नशिबी कसं संघर्ष घेउन येईल हे सांगता येत नाही. परंतू सामाजिक बांधिलकीची जाणिवेतून एखाद्याचा संघर्ष आपण कमी करु शकतो ,रोखू तरि शकतो ,हे देखिल तितकंच खरं आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक /अर्जुनी तालुक्यातील राका/पळसगाव हे शेवटचे गाव या गावात छैलेंद्र चौधरी यांचे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदायचे त्याची पत्नी वनिता ,शिकलेली व्यवहारात हुशार छैलेंद्र हा निरक्षर . वनिताचा पहिला मुलगा दिशांत जन्मापासूनच दिव्यांग आहे.वनिताने दुस-यांदा गोंदिया येथिल शाशकीय रुग्णालयात मुलीला जन्म दिला परंतु मुलीच्या जन्मानंतर काही तासांतच वनिताची प्रकृती इतकी खालावली की तीला नागपूर येथील शासकीय मेडिकल हास्पीटल ला रेफर करण्यात आलं परंतू सरते शेवटी वनिताने या जगाचा निरोप घेतला,आता तिच्या पाठिमागे राहिले ते तीची दोन्ही निरागस कोवळी मुलं दिशांत व काव्या .तीन महिण्या अगोदर निधन झालेल्या पत्नीच्या विरहात खचून न जाता छैलेंद्र खंबीर राहिला.ज्या आदिवासी हलबी समाजात छैलेंद्र जन्मास आला त्या कारणाने म्हणा किंवा त्याच्या निरक्षरपणा मुळे म्हणा त्याच्या पत्नीच्या मृत्युचे कारण त्याला सांगितले गेले नाही. आज तो तीन महिन्याच्या काव्या ला टाकून कामधंद्यावर जाऊ शकत नाही ,ती रडली की त्यालाच तीच्या दुधाची सोय करावी लागते,दुध विकत घेण्याइतपत पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही , मुलीच्या दुधासाठी छैलेंद्र दारोदार भटकत असतो अक्षरशः भीक मागून जगायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे वीतभर पोटासाठी कधी दिवसभर मुलांना सांभाळून त्याला रात्रीला कुणाचे काम करून द्यावे लागते , दिव्यांग असलेला दिशांत व तीन महिन्याच्या काव्याला टाकून तो दिवसा कामावरही जाऊ शकत नाही.ईवल्याशा बाळासाठी छैंलेंद्र बापाचा आई होऊन जगतो आहे ,लहानग्या मुलांसाठी संघर्ष करित जिवन गाणे गातो आहे. शासनामार्फत अनेक शासकीय योजना बालकांच्या हितासाठी राबविल्या जातात एखादी योजना काव्या व दिशांत च्या जिवनात नविन दिशा घेउन येईल काय हाच खरा प्रश्न आहे.

news portal development company in india

Read More Articles