मुंबई : बॉलिवूड सिनेमातले हीरो नंबर वन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदा यांनी एक काळ गाजवला होता. या क्षेत्राच्या बाहेरून या क्षेत्रात आलेल्या या अभिनेत्याने असं काम केलं, की त्या वेळी अनेक स्टारकिड्सना कामाची संधी मिळत नव्हती. सिनेमा क्षेत्रात काम केल्यानंतर 2004मध्ये गोविंदा यांनी काँग्रेस पक्षाद्वारे निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला. ती निवडणूक गोविंदा यांनी जिंकली आणि ते खासदारही झाले. आता वीस वर्षांनी पुन्हा एकदा गोविंदा राजकारणात नशीब आजमावण्याचा विचार करत आहेत. या वेळी पक्ष नवा आहे. गोविंदा यांनी 28 मार्चला शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. आता ते निवडणुकीच्या स्पर्धेत उतरण्यासाठी तयार आहेत. गोविंदा यांनी चित्रपटसृष्टीत आपली जादू पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर ते यू-ट्यूब चॅनेलवर आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत गाणी रिलीज करू लागले. दोन दशकांनंतर आता गोविंदा नव्या पक्षाचा हात धरून निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांची राजकीय दुसरी इनिंगदेखील चित्रपटसृष्टीतल्या दुसऱ्या इनिंगसारखी निष्प्रभ ठरणार की ते राजकारणातले हीरो नंबर वन बनणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ज्योतिष गुरू आणि वास्तुतज्ज्ञ मृगेंद्र चौधरी यांनी त्यांची कुंडली पाहून त्यांच्या ग्रहस्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्याविषयी जाणून घेऊ या.
मृगेंद्र चौधरी यांनी सांगितलं, की इंटरनेटवर उपलब्ध कुंडलीसंग्रह तेंडुलकरनुसार गोविंदा यांची जन्मतारीख 21 डिसेंबर 1963 ही आहे. त्यांची जन्मवेळ आहे रात्री 9 वाजता आणि जन्मस्थळ आहे विरार. या माहितीच्या आधारे त्यांची जन्मकुंडली कर्क लग्नकुंडली आहे. त्यांच्या कुंडलीत सहाव्या स्थानावर मंगळ, बुध, सूर्य आणि केतू हे ग्रह आहेत. सातव्या स्थानी शनी आणि शुक्र हे ग्रह आहेत. लग्नेश चंद्र अष्टमात आहे. बृहस्पती उत्तम स्थानात नवव्या स्थानात म्हणजेच भाग्यस्थानात आपल्या राशीत म्हणजे मीनमध्ये आहे. याच प्रकारे राहू उच्चीचा होऊन बाराव्या स्थानात आहे. त्यांच्या कुंडलीतून माहिती मिळते, की 21 जानेवारी 2014 पासून त्यांची बुध महादशा सुरू झाली असून, ती जानेवारी 2031पर्यंत असेल.
कापराचे हे छोटे उपाय देतील मनःशांती आणि दूर होतील ग्रहदोष
मृगेंद्र चौधरी सांगतात, की सर्वसामान्यपणे राजकारणात यशासाठी लग्न दुसरं स्थान, चौथं, सातवं, नववं, दहावं आणि अकरावं स्थान मजबूत असायला हवं. दहावं स्थान पद-प्रतिष्ठा दर्शवतं. चौथं स्थान जनतेचं प्रेम दर्शवतं आणि सातवं स्थान निवडणूक जिंकणार की नाही हे दर्शवतं. भाग्य कसं असेल हे नववं स्थान दर्शवतं.
या कुंडलीच्या आधारावर बोलायचं झालं, तर गोविंदा यांना नागरिकांचं प्रेम कायमच मिळत राहिलं आहे आणि मिळत राहीलही. कारण त्यांच्या चौथ्या घराचा स्वामी शुक्र सातव्या स्थानी आहे आणि सातव्या स्थानाचा स्वामी शनीदेखील आपल्याच स्थानात आहे. त्यांना भाग्यदेखील साथ देतं. कारण त्यांच्या कुंडलीत बृहस्पती स्वस्थानी म्हणजेच नवव्या स्थानी आहे. समस्यांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्या 10व्या स्थानाचा स्वामी मंगळ सहाव्या स्थानी बसला आहे. त्यामुळेच त्यांना पद-प्रतिष्ठा मिळण्यात अडचणी येतील. त्यासोबतच लग्नेशही आठव्या स्थानात आहे. अशी व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. अशी व्यक्ती अति-विचार करत राहते आणि आपल्या निर्णयावर बराच काळ ठाम राहू शकत नाही.
घरात सुख-शांती नसण्यामागं या गोष्टी असतील कारण; अनेकजण त्याकडं दुर्लक्ष करतात
मृगेंद्र चौधरी म्हणतात, की या कुंडलीच्या आधारे सांगायचं, तर 11 नोव्हेंबर 2001 ते 11 जानेवारी 2005पर्यंत गोविंदा यांच्या कुंडलीत शनीमध्ये शुक्राची दशा होती. तो त्यांच्या जीवनाचा सुवर्णकाळ होता. त्यामुळे 2004 साली ते निवडणूक जिंकले. जानेवारी 2005नंतर त्यांच्या शनीमध्ये रवी (सूर्य) आला, त्यानंतर त्यांचा पडता काळ सुरू झाला. रवी त्यांच्या सहाव्या स्थानात आला तेव्हा ते हळूहळू यातून बाहेर आले. आता त्यांच्या कुंडलीत बुधाची महादशा आहे. त्यामुळे 2014पासून त्यांचा डाउनफॉर्म सुरू आहे. बुध सहाव्या स्थानात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मेहनत करवून घेतली जात आहे; मात्र त्याचं त्यांना फळ मिळत नाही. त्यांच्या जीवनात हा संघर्ष 2031पर्यंत सुरू राहणार आहे. राहू 12व्या स्थानी उच्चीचा आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या लिंक्स बनत राहतील आणि त्याचा त्यांना फायदाही होईल. त्यांच्याबरोबर नवनव्या व्यक्ती जोडल्या जातील आणि त्याचा त्यांना फायदा होईल. या वर्षी सप्टेंबरनंतर गोविंदा यांना काही अडचणी येतील आणि त्या 2026पर्यंत सुरू राहतील.
प्रेयसी-प्रियकराला रंग लावण्यापूर्वी आजचं लव्ह राशीफळ पहा; रंगपंचमी लाभदायी?
मृगेंद्र चौधरी सांगतात, की 2026मध्ये त्यांच्या बुधात बृहस्पती येईल. त्यानंतर त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होईल. 2031पर्यंत त्यांच्या जीवनात संघर्ष आहे. तो कमी होईल. या कुंडलीनुसार गोविंदाच्या वयाच्या 67व्या वर्षी, 2031पासून सुवर्णकाळ पुन्हा सुरू होणार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला सुरुवात होईल. पद-प्रतिष्ठा सर्व काही मिळेल. म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच गोविंदा यांनाही वाढत्या वयात यश मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.