कानपूर : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे. यात एका 22 वर्षीय तरुणाने एका 80 वर्ष वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती महिलेचा नातेवाईकच होता. पोलिसांनी आरोपी अमित गौतमला अटक केली आहे. कानपूरच्या बिल्हौर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा ही महिला घरात झोपली असताना ही घटना घडली. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेला बेदम मारहाण करून तिचा एक दातही तोडला. महिला जोरजोरात ओरडू लागताच आरोपीने भिंतीवरून उडी मारून पळ काढला.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त (पश्चिम) विजेंद्र द्विवेदी म्हणाले, “कलम 376 (बलात्कार), 325 (गंभीर दुखापत करण्यासाठी शिक्षा), 452 (घरात घुसखोरी) अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
अधिकाऱ्याने सांगितलं की, महिला आरोपीची आजी असून ते दोघेही एकाच परिसरात राहत असल्याचं तपासात समोर आलं आहे. “आरोपी मजुरीचं काम करतो आणि त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे. वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यापूर्वी त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केलं होतं,” असं अधिकाऱ्याने सांगितलं. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केलं गेलं आणि तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दत्तक मुलीचं शारीरिक शोषण
तमिळनाडूच्या मदुराईमध्ये अशीच एक घटना उघड झालीय. लष्करात सुभेदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानानं स्वतःच्या दत्तक मुलीचं शारीरिक शोषण करून नंतर तिची हत्या केली. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनंही हा गुन्हा लपवण्यात त्याची मदत केली. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.