नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महागाई वाढत असताना एप्रिल फुल नाही तर खरंच गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये गॅसचे दर कमी झाले आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 30-32 रुपयांनी घट झाली आहे. मार्च महिन्यात सिलिंडरचे दर वाढले होते. एप्रिल महिन्यात व्यावसायिक, हॉटेल इंडस्ट्री आणि छोटे व्यवसायिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांहून अधिक घट झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीबद्दल बोलायचे झालं तर त्यात कोणताही बदल झालेला नाही. 9 मार्च रोजी शेवटचे दर बदलले होते मात्र त्यानंतर सलग तेच दर आहेत. त्यामुळे गृहिणींना कोणताही दिलासा मिळाला नाही.
गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती, त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचे दर घसरले होते. त्याआधी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार इथे चेक करा.
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत
राजधानी दिल्ली- 803 रुपये
कोलकाता- 829 रुपये
मुंबई – 802.50 रुपये
चेन्नई- 818.50 रुपये
कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत
राजधानी दिल्ली- 1764.50 रुपये
कोलकाता- 1879 रुपये
मुंबई – 1717.50 रुपये
चेन्नई- 1930 रुपये
घरबसल्या कसा बुक करायचा गॅस सिलिंडर
तुमचा गॅस सिलिंडर संपला असेल तर तुम्ही मेसेजद्वारेही बुक करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुमच्या गॅस एजन्सीच्या मेसेजद्वारे गॅस बुक करण्यासाठी क्रमांक घ्या. त्यानंतर तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन गॅस एजन्सीचे नाव, स्पेस एसटीडी कोड आणि वितरकाचा फोन नंबर लिहून त्या नंबरवर पाठवावा लागेल. हा SMS तुमच्या गॅस बुकवर दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे.
तुमच्या गॅसबुकवर दिलेल्या नंबरवरुन तुम्ही फोन लावून देखील गॅस बुक करु शकता. ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. गॅस बुक केल्यानंतर दोन ते तीन दिवसात तुम्हाला गॅस सिलिंडर घरपोहोच मिळू जातो. याशिवाय तुम्ही Whatsapp च्या मदतीनेही गॅस सिलिंडर बुक करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.