संबंधित बातम्या
लखनऊ : भरधाव स्कूल बस उलटल्याने चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अपघातात २५ मुलं जखमी झाले आहेत. स्कूल बसचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळते. अपघात इतका भीषण होता की चार मुलांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक मुलं जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हा अपघात उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी बाराबंकी इथं एक भरधाव वेगाने निघालेली बस उलटली. या अपघातात चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर अपघातामध्ये २५ मुलं गंभीर जखमी झाली आहेत. विकासखंड सूरतगंज इथल्या एका शाळेचे विद्यार्थी फिरण्यासाठी आणि पिकनिकला लखनऊला गेले होते. लखनऊहून परत येताना ही दुर्घटना घडली. घटनेनंतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
छ. संभाजीनगरमध्ये भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू
बस विद्यार्थ्यांना घेऊन परतत असताना सलारपूर इथं उलटली. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दु:ख व्यक्त केले असून अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. जखमी मुलांवर योग्य उपचार करा असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांनी सांगितलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.
- First Published :