संबंधित बातम्या
नवी दिल्ली : काही घटना अशा असतात, ज्यांच्याबद्दल ऐकूनही कोणचाही थरकाप उडेल. अनेकदा लोक दुसऱ्या शहरात गेल्यावर किंवा बाहेर कुठे फिरायला गेल्यावर हॉटेल रूम बुक करतात. मात्र, काहीवेळा या रूममध्येच गेस्टने भयानक पाऊल उचलल्याच्या घटनाही समोर येतात. आता असंच आणखी एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे, ज्याने पोलिसांनाही गोंधळात टाकलं.
अरुणाचल प्रदेशातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. इथे एका हॉटेलमध्ये केरळचे तीन लोक मृतावस्थेत आढळून आले, त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की, केरळमधील कोट्टायम येथील नवीन थॉमस (वय 39) हे तिरुवनंतपुरम येथील रहिवासी पत्नी देवी बी (39) आणि आपली मैत्रीण आर्य बी नायर (29) यांच्यासोबत 28 मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते.
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून तिघेही दिसत नव्हते आणि मंगळवारी पहाटे त्यांना संशय आल्यावर कर्मचारी तपासणी करण्यासाठी गेले. यावेळी रूम आतून बंद असल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, “जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिन्ही लोक मृतावस्थेत आढळले”. नायरचा मृतदेह पलंगावर होता, तिचं मनगट ब्लेडने कापलेलं होतं, तर देवी बी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. त्यांच्याही मनगटाच्या उजव्या बाजूलाही कापल्याच्या खुणा होत्या.
डाव्या हाताच्या मनगटावर जखमेच्या खुणा असलेला थॉमस वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळला. अधिकाऱ्याने सांगितलं की, शवविच्छेदन अहवाल आज अपेक्षित आहे. या गूढ घटनेची सर्व संभाव्य पैलू लक्षात घेऊन कसून चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तिरुअनंतपुरममध्ये नायर बेपत्ता असल्याची एफआयआर नोंदवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.
- First Published :