लग्नसमारंभात भयंकर घडलं! कडेवरून उकळत्या पाण्यात पडली 7 महिन्यांची चिमुकली, गेला जीव

जयपूर : घरात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचं लग्न असलं की सगळे अगदी आनंदात असतात. नवीन कपड्यांपासून डान्स, गाणं हे सगळं या कार्यक्रमात सुरू असतं. या लग्नात सहभागी होण्यासाठी सगळे पाहुणे एकत्र येतात. मात्र, कधीकधी अशाही काही घटना समोर येतात, ज्यामुळे लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलतो. आता अशीच एक घटना समोर आली आहे, जी हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात आपल्या आईसोबत एका लग्नासाठी आलेल्या 7 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

बिकानेरच्या गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्न समारंभात बटाटे उकळल्यानंतर गरम पाणी तसंच ठेवण्यात आलं होतं. या गरम पाण्यात पडून सात महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला कडेवर घेऊन जाणारी तिची नातेवाईकही यात गंभीर भाजली. त्यामुळे विवाह सोहळ्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. तर गंभीर भाजलेल्या दुसऱ्या मुलीवर पीबीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गजनेर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील आग्नेऊ गावात मंगळवारी हा अपघात झाला. रामदेव यांच्या घरी लग्न होतं. त्या लग्नात बिझरवली येथील गौरीशंकर यांची सात महिन्यांची मुलगी तनुजा तिच्या आईसह उपस्थित होती. लग्न समारंभात तिच्या नातेवाईकाची आठ वर्षांची मुलगी अंकिता हिने तनुजा हिला कडेवर घेतलं होतं. या इमारतीच्या एका बाजूला आचारी मिठाई आणि जेवण बनवत होते.

आचाऱ्यांनी तिथे उकडलेले बटाटे ठेवले होते. बटाटे उकळल्यानंतर त्यांनी बटाटे काढून घेतले मात्र भांड्यात गरम पाणी तसंच होतं. त्याचवेळी अंकिता तिथून तनुजाला कडेवर घेऊन बाहेर आली. पण अचानक तिचा पाय अडखळला आणि ती पडली. यामुळे तनुजा तिच्या कडेवरून घसरली आणि बटाटे उकडलेल्या गरम पाण्याच्या भांड्यात पडली. हे पाहून तिथे उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली.

या घटनेत तनुजा गंभीर भाजली आणि अंकितावरही गरम पाणी पडलं. लोकांनी तात्काळ दोघींनाही पीबीएम रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेलं. मात्र 80 टक्क्यांहून अधिक भाजल्याने तनुजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकितावर अद्याप उपचार सुरू आहेत. तनुजाच्या मृत्यूनंतर विवाह सोहळ्यात शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

news portal development company in india

Read More Articles